ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण २ – अनुतापनिरुपणं
श्रीगणेशायनमः ॥ आतांसंतासींनमस्कार ॥ जेपूर्णकृपेचेसागर ॥ करितीदीनांचा उद्धार ॥ निजसामर्थ्ये ॥१॥ कायावाचाआणिमन ॥ जयांसीगेलियाशरण ॥ तत्काळपाविजेपूर्ण ॥ परब्रह्म ॥२॥ केवळआनंदाचियामूर्ती ॥ जेज्ञानविज्ञानचक्रवर्ती ॥ त्यांपुढेबोलावयास्फूर्ती ॥ कैंचीमज ॥३॥ त्यांहीज्यालाआपुलेंह्नणविलें ॥ त्याचेंभलतसेंवाटेचांगलें ॥ त्यांसीभक्तीनेंजेंअर्पिलें ॥ तेंस्वीकारिती ॥४॥ हेंअंतींबरवेंकवळलें ॥ म्हणोनिनिभर्यमनजालें ॥ सहजचिबळदुणावलें ॥ बोलावयासी ॥५॥ मीकेवळआहेंबुद्धिहीन ॥ परिसंताचीआज्ञाप्रमाण ॥ त्यांच्यासामर्थ्येनिरुपण ॥ करुंकांहीं ॥६॥ जाणूनिसद्गुरुचाअंकित ॥ सहजकृपाकरितीलसंत ॥…